हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या हवेली ‘तालुकाध्यक्षपदी’ कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे वरिष्ठ कर्मचारी दिलीप मारुती बरडे यांची निवड करण्यात आली आहे. तर दिलीप पांडुरंग काळभोर यांची ‘सल्लागार’ पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे वरिष्ठ संगणक लिपिक मच्छिंद्र त्रिंबक आढाळे यांची पुणे जिल्हा कार्यकारणी संगणक तज्ञप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, सरचिटणीस व जेष्ठ नेते ज्ञानोबा घोणे, राज्य कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र व्हावळ, पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले आहे.
पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ व नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बरडे काळभोर व आढाळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे संस्थापक – सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश बडदे, दीपक काळभोर, पुणे जिल्ह्यातील विविध गावाचे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे वरिष्ठ संगणक लिपिक मच्छिंद्र त्रिंबक आढाळे यांची निवड करण्यात आली आहे.