Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : “शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, वक्तृत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ग्रामीण भाग असूनही थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी विद्यालयाने फिरती ट्रॉफी मिळवून इतिहास घडवला आहे. ही अत्यंत कौतुकास्पद अशी बाब आहे”, असे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी सांगितले.
‘लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट’ आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
पुण्यातील उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ४५ वर्षांपासून पुणे शहर व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयाची गोडी लागावी यासाठी आंतरशालेय निबंध लेखन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. (Loni Kalbhor News) यावर्षीही ‘लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट’ आयोजित ४५ वी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात एकूण ८० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे आयोजन ‘लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट’चे अध्यक्ष ज्ञानेश्वर थोरवे, मुख्य समन्वयक रेखा ठाकोर, सह समन्वयक विजय डांगरा, सचिव सागर भोइटे यांनी केले. (Loni Kalbhor News) स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ट्राफी व प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देण्यात आली. तसेच सर्व गटांसाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक
थेऊर येथील चिंतामणी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सिद्धी धर्मेंद्र सावंत इयत्ता ६ वी अ ही फिरत्या ट्रॉफीची मानकरी ठरली. तिच्या वक्तृत्वाचा विषय – स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातील भारत असा होता. उत्तेजनार्थ क्रमांक कु. फुलारी झोया अहमद इयत्ता ५ वी अ तिचा विषय माझे आजी-आजोबा असा होता.
सहभागी विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे –
कु. माळवदकर रेवती, कु. शितोळे गौरी, कु. शेख आलिया, कु. जेठीथोर विद्या, कु. शेख नवीद, कु. चव्हाण अक्षरा, कु. काळे मिताली, कु. जाधव संजना, कु.शेख मुस्कान, कु.थोरे प्रतीक्षा, कु. लटके आरती, कु.पडळकर मयुरी हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, या वक्तृत्व स्पर्धेसाठी (Loni Kalbhor News) विशेष सहाय्य चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात, वक्तृत्व मार्गदर्शन व लेखन शिक्षिका वाडकर, सहकार्य शिक्षिका नजन, रोटे, कंद, कानकाटे, नरवणे, लोंढे मामा इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : श्रीमद् भागवत गितेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर : प्रा.डॉ.मंगेश कराड