Loni Kalbhor News : पुणे- कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील एका “किन्नर टोळी” कडुन आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवुन नेऊन, त्याला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात असल्याची गंभीर तक्रार एका अठ्ठेचाळीस वर्षीय पालकाने लोणी काळभोर पोलिसात दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलाला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवु पहाणाऱ्या टोळीतील बहुतांश सदस्य बनावट किन्नर असल्याचा आरोपही संबधित पालकाने केला आहे. (An attempt was made to brainwash a seventeen-year-old minor from Loni Kalbhor area into a “kinnar”.)
दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी, लोणी काळभोर गावातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवुन नेऊन, त्याला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात (Loni Kalbhor News ) असल्याबाबतची लेखी तक्रार आली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. ‘मिसींग’ झालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार तपास चालु असुन, संबधित मुलाचा शोध पोलिस यंत्रणा घेत असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ शी बोलतांना स्पष्ठ केले आहे.
कदमवाकवस्ती हद्दीतील एका “किन्नर टोळी” वर अल्पवयीन मुलाच्या 48 वर्षीय पित्याचा आरोप..
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मागील कांही वर्षापासुन सखाराम हा आपली पत्नी यशोदा व त्यांची दोन मुले, राजु व संजु (सर्वांची नावे बदलेली आहेत) असे चार जण राहत आहेत. सखाराम याचा थोरला मुलगा राजु (जो मागील दहा दिवसापासुन गायब आहे) हडपसर येथे शिक्षण घेत आहे. (Loni Kalbhor News ) तर दुसरा मुलगा संजु दहावीला आहे. राजु 25 मे 5 जुन या बारा दिवसाच्या काळात घऱातून गायब झाला होता. या दहा दिवसाच्या काळात सखाराम व त्याचा धाकटा मुलगा संजु, हे दोघेजण राजु बाबत माहिती घेत असताना, कदमवाकवस्ती हद्दीत राहणारी एक टोळी राजुला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात असल्याची माहिती समजल्याचा आरोप सखाराम ने केला आहे.
याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ शी सखाराम म्हणाले, आमचे कुटूंब हे वारकरी पंथातील असुन, राजुही नित्यनेमाने लोणी काळभोर परीसरात भजन-किर्तणासाठी जात होता. मात्र 25 मेला घरातुन गेला तो परत आलाच नाही. घऱातुन गेल्यानंतर त्याची माहिती घेत असतांना, राजुला लोणी काळभोर येथील एका कुंटुबाने घऱात कोंडुन ठेवल्याची माहिती आम्हाला एकाने दिली. (Loni Kalbhor News ) तर राजु काही किन्नरांच्या बरोबर नाचत असल्याचे फोटो व व्हिडीओही आम्हाला मिळाले. या माहितीच्या आधारे राजु चा पाठपुरावा केला असता, राजुला काही बनावट किन्नर मंडळी ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात असल्याची बाब आमच्या लक्षात आली. आमचे कुटुंब व नातेवाईक राजुचा पाठपुरावा करत असल्याचे लक्षात येताच, संबधित टोळीने राजुला आमच्या घरी पाठवले. मात्र 5 जुनला काही तासासाठी घरी आलेला राजु पुन्हा गायब झाला आहे.
सखाराम बोलतांना पुढे म्हणाले, राजु गायब झाल्यानंतर आम्ही लोणी काळभोर पोलिसात धाव घेवुन, राजुबाबत घडलेली सर्व वस्तुस्थिती पोलिसांना सांगितलेली आहे. पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र तक्रार मागे घ्यावी यासाठी कांही महिला संघटना, किन्नर मंडळी, समाजसेवक आमच्यावर दबाव आणत आहेत. दबाव आनणाऱ्यात काही पत्रकारही आहेत. (Loni Kalbhor News ) आमचा सतरा वर्षाचा मुलगा गायब झालेला असतांना, आमच्यावर दबाव टाकणे ही बाब अतिशय गंभीर आहे. तर दुसरीकडे मुलाला बळजबरीने किन्नवर बनविणे ही तर बाब समाजाच्या दृष्ट्रीने अतिशय गंभीर व सर्वानाच विचार करायला लावणारी आहे. अल्पवयीन मुलांचे ब्रेनवॉशिंगच्या करुन, त्याला बळजबरीने “किन्नर” बनवणे ही बाब त्याहुनही अधिक गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे.