Loni kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मिना शिवाजी शिंदे (वय – ४५) यांचे सोमवारी (ता. २७) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
माळीमळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे यांच्या त्या पत्नी होत. तर सिरम कंपनीतील कामगार मयूर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.
दरम्यान, मिना शिंदे यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!