Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident : नगर-पुणे महामार्गावरील ‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या सहावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 15:15

युनूस तांबोळी

(Accident ) पुणे : ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शिरूर तालुक्यातील देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या गाडीला अपघात झाला होता. या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील आमदाबादकरांना पुन्हा धक्का बसला आहे.

अपघातात गंभीर जखमी असलेला समाधान श्रावण साळवे (वय १८) यांच्या पाठोपाठ ओंकार जालिंदर गोरखे (वय १७) यांचाही नगर येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने अपघातील मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे.

 

देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते…!

बुधवारी (दि. २२) आमदाबाद येथील तरुण छोट्या टेम्पोतून शनिशिंगणापूर व देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर कामरगाव जवळ झालेल्या या अपघातात विजय अवचिते, राजेंद्र साळवे, मयूर साळवे व धीरज मोहिते यांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले होते. त्यापैकी समाधान श्रावण साळवे यांचा शनिवारी तर ओंकार गोरखे यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गोरखे हा मूळचा नगर जिल्ह्यातील असून तो शिक्षणासाठी मामाकडे आमदाबाद येथेच वास्तव्यास होता. समाधान साळवे व ओंकार गोरखे हे शालेय शिक्षण घेत होते, तसेच वाजंत्री कलाकार म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. गावातील युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थांवर मोठी शोककळा पसरली आहे.

दरम्यान उर्वरित अन्य जखमी रुग्णांवर उपचार सुरू असून हे सर्वजण गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने माजी सरपंच योगेश थोरात, सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक माशेरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे या अपघातग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदाबाद येथील नागरिकांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni kalbhor News : लोणी काळभोर येथील मिना शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.