Loni Kalbhor Maldhakka | लोणी काळभोर : पुणे रेल्वे विभागातील लोणी काळभोर, तळेगाव व चिंचवडच्या मालधक्क्यांचा विकास लवकरच केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आणि लोणी काळभोर येथील मालधक्क्यासाठी जागेच्या मोजणीचे काम सुरू आहे. अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
पुणे रेल्वे विभागातील मालवाहतूक वाढावी म्हणून मालधक्क्याचा विकास केला जाणार आहे. या तिन्ही ठिकाणी नवी लाइन टाकली जाणार आहे. त्यामुळे मालाचे लोडिंग व अनलोडिंग (माल भरणे आणि उतरवणे) करणे सोपे जाणार आहे. या तिन्ही मालधक्क्यांच्या विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ट्रॅकची लांबी कमी…
लोणी काळभोरच्या मालधक्क्यावर रोज २ मालगाड्यांमध्ये माल भरला जातो, तर ३ मालगाड्यांमधून माल उतरविला जातो. लोणी काळभोरला बीटीपीएन व एनएमजी प्रकारच्या मालगाड्या येतात. मात्र सद्यःस्थितीत असणाऱ्या ट्रॅकची लांबी कमी असल्याने येथे मालगाडी आल्यावर त्याची दोन भागांत विभागणी केले जाते.
दरम्यान, या धक्क्यावर माल उतरवताना अनेक अडचणी येतात. वेळ खूप वाया जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या ट्रॅकचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी ट्रॅकच्या शेजारच्या परिसराचादेखील विकास केला जाणार आहे.
तीन मालधक्क्यांच्या विकासासाठी सुमारे १०० कोटी…
लोणी स्थानकाच्या मालधक्क्यासाठी ४७ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी जागेची मोजणी सुरू झाली आहे. तर तळेगाव व चिंचवड स्थानकाजवळदेखील मालधक्क्यासाठी स्वतंत्र लाइन टाकली जाणार आहे. तळेगावसाठी ३५ कोटी व चिंचवडसाठी १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असा तीन मालधक्क्यांच्या विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल