विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मेडीअम स्कूलचा (इंग्रजी माध्यम) सलग ५ वर्ष १०० टक्के निकाल लावण्याची परंपरा जपत यंदाही इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्या पोर्णिमा शेवाळे यांनी दिली आहे. (Priya Satpute of English Medium School stood first in class 10 examination; The school at Loni Kalbhor has maintained the tradition of getting 100% results for 5 consecutive years)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस (Loni Kalbhor) ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.
या परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थी प्रिया गंगाधर सातपुते हिने ९२.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. राज अमोल कन्हेरे याने ९२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर विवेक मनोज काळभोर याने ९०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. (Loni Kalbhor) तर भानुदास दयानंद शर्मा याने ८८.८० टक्के व अथर्व भारत मोरे याने ८७.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला आहे.
संस्थेच्या पदाधिका-यांनी केले विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन
दरम्यान, यशस्वी झालेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य सीताराम गवळी, प्राचार्या पोर्णिमा शेवाळे व पर्यवेक्षिका (Loni Kalbhor) प्रा. विद्यावती शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : एंजल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एस. एस. सी. परीक्षेत भरघोस यश
Loni Kalbhor : मांजरी खुर्द येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
Loni Kalbhor : थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के