विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) Loni Kalbhor Crime – लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor Crime) ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण (Loni Kalbhor Crime) करणारे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ सुरु केली आहे. (Loni Kalbhor Crime) मारहाण झालेल्या भोसले कुटुबिंयाची गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रही भुमिका असतानाही, गुन्हा दाखल होऊच नये, यासाठी पोलिसांनी ”ठंडा करके खाओ” अशी भुमिका घेतली आहे. (Loni Kalbhor Crime)
तर दुसरीकडे मारहाणीचे पुरावे दिले असतानाही, लोणी काळभोर पोलिस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याबद्दल भोसले कुटुबिंयानी लोणी काळभोर पोलिसांच्या भुमिकेबद्दल आक्षेप घेतला आहे. पुढील बारा तासाच्या आत वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास, पोलिस आयुक्तांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याची भुमिका भोसले कुटुबिंयाच्या वतीने उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले यांनी जाहीर केली आहे. दरम्यान मारहान करणाऱ्यापैकी दोघेजण मोठ्या प्रमाणात दारु पिले असल्याचा आरोप संतोष भोसले यांनी केला असुन, याबाबतचे दोन व्हिडीओही “पुणे प्राईम न्युज” च्या हाती लागले आहेत.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीसमोर संतोष भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापत असतांना मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या चार सहकारी पोलिसांनी अल्पवयीन मुले व कांही नागरीकांना बेदम मारहाण केली होती. यावेळी मारहाण करु नये अशी विनंती करणाऱ्या महिलांनाही पोलिसांनी शिवीगाळ केली होती. याबाबतची लेखी तक्रार मिळुनही वरीष्ठांनी वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबत ठोस भुमिका न घेतल्याने, नागरीकांच्यात मोठी नाराजी पसरली आहे.
घटनेचे आनखी दोन व्हिडीओ व्हायरल..
दरम्यान, भोसले चाळीतील घटनेत वैभव मोरे व त्यांचे सहकारी अल्पवयीन मुलांना मारहाण करताना व दमदाटी करतानाचे आणखी एक व्हीडीओ “पुणे प्राईम न्युज” च्या हाती लागला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत दारु अती झाल्यामुळे एक पोलीस कर्मचारी पोलिस ठाण्याच्या आवारातच उलट्या करत असल्याचा व्हीडीओही “पुणे प्राईम न्युज” च्या हाती लागला आहे. या दोन्ही व्हिडीओ मुळे घडलेल्या घटनेवर व वौभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकुनच कार्यपध्दतीवर प्रकाश पडणार आहे.