लोणावळा, (पुणे) : Lonavala Crime News – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी छापा कारवाई केली. (Lonavala Crime News) या कारवाईत १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Lonavala Crime News)
५ जणांवर गुन्हा दाखल
राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय २७, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय ३०, रा पंजाबी काॅलनी, सायन कोळीवाडा), शशांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर, सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच आणि दूरचित्रवाणी असा एक लाख ५७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई लोणावळ्यातील एका बंगल्यात करण्यात आली आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान राॅयल विरुद्ध लखनऊ जाएंट यांच्यामध्ये जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएल सामन्यावर काही जण एका खाजगी बंगल्यात बसून सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. या पथकाने तुंगार्ली भागातील बंगल्याजवळ सापळा लावत बुधवारी रात्री छापा मारला. यावेळी बंगल्यामध्ये वरील सर्वजण वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या विविध मोबाइल सिमच्या माध्यमातून काही ॲप्लिकेशनचा वापर करत लॅपटाॅपवर सट्टा घेत असताना सापडले.
दरम्यान, शासनाची बंदी असताना देखील फसवणूक करत सट्टा सुरू असल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लोणावळा वॅक्स म्युझियम मध्ये रामविलास पासवान यांचा मेणाचा पुतळा…!