Kunjirwadi News लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून राबविण्यात आलेल्या महाराजस्व अभियानामार्फत जनतेचे प्रश्न योग्य हाताळून सोडविण्यासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल कुंजीरवाडीचे (ता. हवेली) पोलीस पाटील मिलिंद मच्छिंद्र कुंजीर यांना शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. (Kunjirwadi News)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानात हवेली तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हवेली तहसील कार्यालयात सन्मानपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले व तहसीलदार किरण सुरवसे यांनी पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. (Kunjirwadi News)
दरम्यान, प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अतिक्रमण केलेले अथवा बंद असलेले पाणंद रस्ते मोकळे करणे, जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल विभागाकडून महाराजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान २६ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत राबविण्यात आले होते. या अभियानामध्ये पोलीस पाटील मिलिंद कुंजीर उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
पुढील काळातही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार
याबाबत बोलताना पोलीस पाटील मिलिंद कुंजीर म्हणाले, ‘नागरिक आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. मात्र, काही अडचणींमुळे शेतकरी व नागरिकांची कामे रखडली असतात. ती कामे महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. तसेच जमिनीविषयक वर्षानुवर्षे सुरु असलेले वाद सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. शासनाने सन्मानपत्र देऊन माझा गौरव केला आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. तसेच यापुढील काळातही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे’.