Koyta Gang – पुणे : पुणे शहरासह उपनगर भागात कोयता गॅंगची (Koyta Gang) दहशत कायम आहे. आता पुन्हा कोयते, पालघन हातात घेऊन दहशत पसरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराई गुंडांसह 5 जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Koyta Gang) हा प्रकार सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पार्किंगच्या जागेमध्ये शुक्रवारी पहाटे २ वाजता घडला. (Koyta Gang)
भर रस्त्यात लोकांवर कोयत्याने वार करुन दहशत पसरविणार्यांना पोलिसांनी पाठलाग करुन जागेवरच गुंडांना धुतल्याचा प्रकार घडला होता. त्याच परिसरात पुन्हा एकदा टोळक्याने कोयते, पालघन घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
विकास जितेंद्र चावडा (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक), मोहन धर्मा राठोड (वय २१), संग्राम ज्ञानदेव शिरसाठ (वय २१), अर्जुन मनोहर शिंदे (वय २०), आदित्य चंद्रकांत आदमाने (वय २०, सर्व रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास चावडा व मोहन राठोड हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत पोलीस नाईक अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड इन्स्टिट्युट मॅनेजमेंट कॉलेजच्या मागे पार्किंगच्या जागेमध्ये तीन दुचाकीवरुन ६ जण आले होते. त्यांच्या हातात कोयते, पालघन अशी शस्त्रे होती.
शस्त्राचा धाक दाखवून ते दहशत पसरवत होते. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. गस्तीवरील मार्शल तातडीने तेथे पोहचले.
पोलिस आल्याचे पहाताच हे टोळके हातातील शस्त्रे व मोटारसायकली तेथेच टाकून मिळेलच्या दिशेला पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले होते. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
koyta Gang : उत्तमनगर भागात कोयता गॅंगची पुन्हा दहशत ; चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोयता गॅंगच्या गुंडांची हलगीच्या तालावर पुणे पोलिसांकडून भर रस्त्यात धिंड
हडपसर येथील कोयता गॅंगच्या टोळीप्रमुखासह १३ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई ; दहा जणांना अटक..!