अमोल दरेकर
Koregaon Bhima News : सणसवाडी : भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने आपली तिसरी चंद्रयान मोहीम फत्ते करत जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. भारताचे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. जेथे यापूर्वी कोणताही देश पोहोचू शकला नव्हता. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर कोरेगाव भीमा येथील रुबाब वाद्य पथकाने ढोल ताशांचा गजर करत जल्लोष साजरा केला.
रुबाब वाद्य पथकाने वादन करत उत्साह वाढवला
या वेळी पथकातील मुलांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत, भगवा ध्वज व तिरंगा ध्वज नाचवत जल्लोष साजरा करतानाच, कोरेगाव भिमा गावातील युवकांनी फटाके फोडून आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेची चंद्रयान ३ मोहीम फत्ते झाल्यावर जपानमध्येही जल्लोष साजरा करण्यात आला.(Koregaon Bhima News) पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत असताना इतर देशांनीही शुभेच्छा दिल्या. याबरोबरच कोरेगाव भीमा सोबतच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी रुबाब वाद्य पथकाने वादन करत भारतीयांचा उत्साह वाढवला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश