सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: सासवड येथील पुरातन श्री चागावटेश्वर मंदिरात दरवर्षी फाल्गुन महिन्यात 21 मार्चपासून म्हणजेच भानू सप्तमी पासून किरणोत्सव सुरू होतो. सूर्योदय झाल्यांवर सूर्याची किरणे थेट मंदिरात गणेश मूर्ती आणि शिवलिंगावर पडतात. हे दृश्य विलोभनीय असते, या मंदिराची रचना हेमांडपती असून, मंदिरातील नदीच्या दोन शिगाच्या मधून सूर्यकिरण थेट मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगावर व गणेश मूर्तीवर पडतात .हे दृश्य साधारणपणे तीन ते चार दिवस असते.
मंदिरात पुजारी अजय बनसोडकर, एडवोकेट अनिकेत भगत, नवनाथ भगत, परशुराम देशमुख हे सुधार समितीचे सदस्य पहाटे पूजेसाठी उपस्थित होते.