Khadakwasla Dam | पुणे : पुणे शहरातील खडकवासला धरणात नऊ मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. धरणात सकाळी ह्या मुली पोहायला गेल्या असता हा प्रकार घडला आहे. यातील सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.
तर दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी या मुलींना बाहेर काढले आहे. धरणात बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधण्यात पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
खुशी संजय खुर्दे (वय 13, पाण्याच्या टाकीजवळ, सोळंकी लेआऊट, ता. बुलढाणा) शितल भगवान टिटोरे (वय 18, आंबोडा झरीझरी, ता. जि. बुलढाणा) अशी मृतदेह मिळालेल्या मुलींची नावे आहेत. तर कुमुद संजय खुरदे (वय 10), पायल संतोष सावळे (वय 16, रा. राजीवनगर, सुरत, गुजरात), शितल अशोक धामणे (वय 17, रा. बोधवड जि. जळगाव.), राशी सुरेश मांडवे वय 9, रा.देऊळघाट , बुलढाणा), पल्लवी संजय लहाणे (वय 10, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा ) मिना संजय लहाणे (वय 32, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा) , राखी संजय लहाणे (वय 16, रा. बोरगाव ता चिखली, बुलढाणा) असे पाण्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्या मुलींची नावे आहेत.
ह्या सातही मुली विदर्भातील बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्या गोऱ्हे खुर्द येथे संजय लहाणे यांच्या घरी मांडव परातणीच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दरम्यान खडकवासला धरणाच्या शेजारी राहणाऱ्या लहाणे यांच्या या नातेवाईक मुलींनी धरणात पोहण्याचा हट्ट केला.
त्यावेळी त्या पाण्यात गेल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने मिना संजय लहाणे यांच्यासह इतर सहा मुली पाण्यात बुडू लागल्या. हे बघून जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी या मुलींना बाहेर काढले आहे. मात्र दुर्दैवाने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Khadakwasla Dam | मोठी बातमी : पुण्यातील खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या
Pune News : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..
Hinjewadi Crime | वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात महिलेने केली बेदम मारहाण; हिंजवडीतील घटना