Khadakwasla Dam पुणे : पुण्यातील खडकवासला (Khadakwasla Dam) धरणावरून एक हादरवणारी घटना समोर आली आहे.एक 10 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडत होता. त्यावेळी आजुबाजूला कोणतीही सुरक्षा नसलेल्या धरणावर या मुलासाठी २५ वर्षीय तरुणीने धाडस केले व मुलास सुखरुप बाहेर काढले.
मात्र या घटनेवर पुन्हा एकदा धरण सारखळी परिसरात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. सुरक्षेसाठी उपाय नसल्याने आणि कर्मचारीदेखील नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात येत आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती पुढील प्रमाणे…!
एक १० वर्षाचा मुलगा खडकवासला धरणात बुडत होता. हे बघून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर याच परिसरात तिच्या 25 वर्षीय कुटुंबियांसोबत ट्रिपसाठी आली होती. त्यावेळी तिला मुलगा पाण्यात बुडताना दिसला आणि तिने एकाही क्षणाचा विलंब न करता पाण्यात उडी घेतली. त्याचवेळी मुलाच्या कुटुंबातील एकाने तरुणीसोबत उडी घेतली व दोघांनी धाडस दाखवून मुलाला सुखरुप पाण्याबाहेर काढले.