गणेश सूळ
Kedgaon News : केडगाव : एक महान योध्दा.. कुशल राजनीतीज्ञ..आणि प्रभावशाली शासक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केडगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.(Rajmata Ahilya Devi Holkar’s birth anniversary was celebrated in Kedgaon with great enthusiasm by conducting various social activities.)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ केडगाव यांच्या वतीने बाजार मैदान केडगाव या ठिकाणी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. (Kedgaon News) जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर दुग्ध पंचनदी जलाभिषेक करून प्रतिमा पूजन करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक पाराजी हंडाळ, विद्यमान संचालक अप्पासाहेब हंडाळ, सभापती दिलीप हंडाळ, सरपंच सुनिल सोडनवर, (Kedgaon News) अभिषेक थोरात, हनुमंत हंडाळ, बाळासाहेब सोडनवर, दसरथ गरदडे, शेखर सोडनवर, संजय गरदडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केडगाव परिसरातील जे नागरिक संस्कृती व पेहरवाचे दैनंदिन जीवनात संवर्धन करतात. अशा बांधवांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (Kedgaon News) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीस सुरुवात झाली. त्यानंतर खोबरे व भंडाऱ्याची धळण, मेंढ्यांचे रिंगण, धनगरी वेशभूषा परिधान केलेल्या नागरिकांनी गजनृत्यावर ठेका धरला.
या मिरवणुकीसाठी प्रमुख आकर्षण महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा असलेल्या वालुग म्हणजेच ढोल वादन! कोल्हापूर येथील श्री बिरदेव वालुग मंडळ (Kedgaon News) यांनी भक्तीत तल्लीन होऊन केलेले ढोल वादन, कैताळ , पवा, गजानृत्य, ढोल ताशा यांच्या सुमधुर वादनाच्या मिलनातून साकारलेली नृत्यकला त्यात नाद हरपून केलेली कला उपस्थितांच्या जयघोष भर घालत होती.
त्याचबरोबर चौफुला येथील जय मल्हार गजीनृत्य मंडळ यांनी धनगरी पारपरिक नृत्य सादर केले. लोकदैवत त्यांची भक्ती त्यातून होणारा ब्रम्हनिनाद म्हणजेच ढोल वादन (Kedgaon News) त्याच ढोलाच्या तालावर देवाच्या प्रती व्यक्त केलेली नृत्यकला म्हणजेच हेडाम अशा विरनृत्याची कला सादरकर्ते बाळासो गाढवे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थितांच्या मनोरंजनात आणखीनच भर घातली.
दरम्यान, गायन ,वादन ,नृत्य अशी पारंपरिक लोककला म्हणजे धनगरी ओवी या ओव्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र आणि मौखिक महाकला सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानाचा दौंडकरांनी घेतला लाभ
Daund News : शेतकरी हवालदिल! टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी