गणेश सुळ
Kedgaon News केडगाव : मतभेद विसरुन समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. तरुणांनी संघटित होऊन ऐक्याची चळवळ उभी करावी व थोर महापुरुषांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. (Kedgaon News) तरच महापुरुषांची जयंती साजरे केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले. (Kedgaon News)
टेळेवाडी (ता. दौंड) येथे राहू बेट परिसरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात गौरवास्पद काम करणाऱ्या अजिंक्य चोरमले (वैद्यकीय), कोमल टेळे, अंजली गाढवे (प्रशासकीय), गणेश कारंडे (अभियंता), संभाजी खडके (क्रीडा पुरस्कार), संदीप गडदे (समाजभूषण), शुभांगी धायगुडे (अहिल्या पुरस्कार) काळुराम महाराज कारंडे (धार्मिक) आदींचा सत्कार करण्यात आला.
बिभीषण गदादे यांचे व्याख्यान झाले. महोत्सवानिमित्त राहू ते टेळेवाडी दरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सातारा येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले. वाळकी येथील काळे मित्रपरिवार व प्रतिष्ठानच्या वतीने गजनृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, दिलीप हंडाळ, धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ, रामकृष्ण बिडगर, बाळासाहेब शिंदे, संभाजी खडके, संदीप गडधे, शुभांगी धायगुडे, शिवाजी टेंगले, बाळासाहेब कारंडे, संतोष टेळे, राजेंद्र टेळे, राहुल टेळे, दादासाहेब टेळे, बाळासाहेब टेंगले, संजय टेळे, सपना मलगुंडे, चेतना पिंगळे, यशवंत टेळे, मीनाक्षी टेळे, नानासाहेब ठोंबरे, भिवराज टेळे, पांडुरंग टेंगले, हरिभाऊ गाढवे, उंडवडीचे माजी सरपंच सचिन गुंड, दिनेश गडदे यांच्यासह राहू बेटपरिसरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.