गणेश सुळ
Kedgaon News केडगाव : चौफुला येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येत होती. (Kedgaon News) त्यावेळी गणपती मंदिर ते चौफुला चौक मिरवणूक चालू होती. (Kedgaon News) या भव्यदिव्य अशा मिरवणुकीला पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली. (Kedgaon News) त्यामुळे महामार्गाच्या बाजूला असलेल्या 11 kv लाईनचे पोल व विद्युत वाहिन्याच्या तारा पुणे-सोलापूर महामार्गावर पसरल्या गेल्या. (Kedgaon News) पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणचे कर्मचारी सागर धायगुडे यांनी व त्यांचे सहकारी अक्षय शिंदे यांनी विशेष कार्य करत अडचणीच्या ठरत असलेल्या सर्व तारा बाजूला करून दिल्या. (Kedgaon News)
पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक देऊन महामार्गाच्या बाजूला असलेल्या तारा महामार्ग रस्त्यावर पसरल्या. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती सागर धायगुडे यांना समजताच त्यांनी सर्वप्रथम सबस्टेशनला घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि विद्युत पुरवठा बंद करून घेतला. त्यानंतर त्यांनी सहकारी शिंदे यांच्यासोबत मिळून अडचणीच्या ठरत असलेल्या सर्व तारा बाजूला करून दिल्या.
पोलिसांचे लाभले सहकार्य
दरम्यान, तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी चोरमले व भोसले यांच्या साहाय्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पण कोणताही विलंब न करता पांडुरंगाच्या रूपाने सागर धायगुडे यांनी सर्वस्वी मदत केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.