उरुळी कांचन : 200 वर्षांची परंपरा व विश्वास जपणाऱ्या जोतिचंद भाईचंद ज्वेलर्स यांच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन उरुळी कांचन (ता. हवेली) येथे झाले. या प्रसंगी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सार्थक सेवा संघ, आंबले गाव (पुणे) येथील अनाथ आश्रमातील बालिकांसोबत हा सोहळा विशेषरित्या पार पडला. तसेच ज्वेलर्सतर्फे संस्थेला 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
या कार्यक्रमाला संचालक स्वप्निल शहा, मुकुलिका शहा, अंशुमालिन शहा तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा कांचन उपस्थित होते. पारंपरिक ढोल-ताशा, समई प्रज्वलन, मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार अशा थाटामाटात सोहळा पार पडला. त्यानंतर जान्हवी किल्लेकर यांनी दालनातील दागिन्यांची पाहणी करून ग्राहकांना भेट दिली.

दरम्यान, आकर्षक दागिने, आधुनिक डिझाईन्स, भव्य दालन व पुरेशी पार्किंगची सोय अशा उत्तम सुविधा घेऊन जोतिचंद भाईचंद ज्वेलर्स आता उरुळी कांचनकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने 25 हजार व त्यापेक्षा जास्त दागिन्यांच्या खरेदीवर मिळवा 24 कॅरेट सोन्याचं नाणं मोफत व प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या शाखेला भेट देऊन आकर्षक व ग्राहकप्रिय योजनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.







