Thursday, June 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 May 2026, 18:42

Kedgaon Murder Case केडगाव, ता. १३ : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एका कामगाराचा निर्घृण खून करून घटनास्थळावरून फरार होण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. रात्री झालेल्या भांडणानंतर कामगाराचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिघांनी घाबरून थेट घरासमोर उभी असलेली जीप चोरून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, चोरीची जीप श्रीगोंद्यात आढळल्याने संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या घटनेमुळे केडगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, “कामगारांतील वाद थेट खुनापर्यंत कसा पोहोचला?” याची चर्चा सुरू आहे. Kedgaon Murder Case

नंदू किसन जाधव (रा. वांबोरी, ता. राहुरी), राजेंद्र मच्छिंद्र केदारी (रा. सोनाई, ता. नेवासा) आणि आकाश रमेश कांबळे (रा. बासुंबा, जि. हिंगोली) यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात खून आणि वाहन चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय अर्जुन गुळमे (वय ४८, रा. केडगाव, जुना टोलनाका) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामगारांच्या भांडणातून उघड झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे केडगाव परिसर हादरला असून, आरोपींनी मृतदेह मागे सोडून चोरीच्या जीपमधून पलायन केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedgaon Murder Case

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुळमे हे शेती व्यवसाय करतात. त्यांनी दीड वर्षांपासून केडगाव येथील गट नंबर २२२ मधील जमीन खंडाने घेतली असून, त्याच परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये बांधकामावरील कामगार राहत होते. ११ मेच्या रात्री गुळमे यांनी त्यांची महिंद्रा कंपनीची जीप (एमएच १२ डब्ल्यू ५२०७) घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला. वाहन चोरीची माहिती त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना वॉट्सअ‍ॅपवरून दिली. Kedgaon Murder Case

दरम्यान, गुळमे यांच्या मुलाच्या मित्राने श्रीगोंदा येथे संशयास्पद अवस्थेत तीच जीप पाहिल्याची माहिती दिली. त्यानंतर गुळमे, त्यांचा मुलगा आणि नातेवाईक श्रीगोंद्यात पोहोचले. तेथे महात्मा फुले चौकात चोरीची जीप मिळून आली. गाडीत तिघे इसम बसलेले होते. त्यातील नंदू किसन जाधव हा बांधकामावर काम करणारा मजूर असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान आरोपींनी धक्कादायक खुलासा केला. रात्री बंद पडलेल्या हॉटेलमध्ये जेवण करताना कामगारांमध्ये जोरदार भांडण झाले. त्या भांडणात सुभाष नावाच्या कामगाराला गंभीर मार लागला आणि तो निपचित पडला. तो मृत झाल्याच्या भीतीने आपण घाबरलो आणि घटनास्थळावरून पळण्यासाठी जीप चोरल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. Kedgaon Murder Case

यानंतर सर्व आरोपींना घेऊन गुळमे आणि त्यांच्या साथीदारांनी केडगावमधील हॉटेल परिसरात धाव घेतली. तेथे हॉटेलसमोरील ओट्यावर सुभाष नावाचा कामगार मृतावस्थेत आढळला. त्याच्या पोटावर आणि गळ्यावर गंभीर मारहाणीचे व्रण दिसून आले. या प्रकारामुळे उपस्थितांच्या अंगावर काटा आला. या प्रकरणी नंदू किसन जाधव,राजेंद्र मच्छिंद्र केदारी आणि आकाश रमेश कांबळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ३(४) आणि ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वागज करत आहेत. Kedgaon Murder Case

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.