Big Breaking हडपसर : हडपसर परिसरातील कामधेनू स्टेटसमधील एका नामांकित रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जिवंत बॉम्ब सापडल्याची घटना आज बुधवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास घडले आहे. त्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. Big Breaking

या घटनेची माहिती अनेकांनी त्वरित पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्बशोधक पथकाने अत्यंत काळजीपूर्वक संशयित वस्तू ताब्यात घेतली. ही वस्तू मोकळ्या जागेत नेण्यात आली, जिथे तिची तपासणी व निष्क्रिय करण्याचे काम सुरू करण्यात आले. पथकाने सर्व प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने पार पाडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही.Big Breaking







