Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 May 2026, 18:25

Breaking News  दौंड, ता. १३ : पाटस (ता. दौंड) येथील आंबिकानगर परिसर सोमवारी रात्री अक्षरशः रक्ताने माखला. जुन्या किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच मुलाच्या डोक्यात कोयत्याचा घाव घालण्यात आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप रसाळ याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. Breaking News

यवत पोलिसांनी प्रमोद उर्फ बापू शरद चव्हाण, बायडाबाई शरद चव्हाण आणि जय प्रमोद चव्हाण (सर्व रा. आंबिकानगर, पाटस, ता. दौंड) यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कांताबाई शंकर रसाळ यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Breaking News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांताबाई रसाळ यांचा मुलगा संदीप हा वरवंड येथे चालक म्हणून काम करतो. महिनाभरापूर्वी आरोपी प्रमोद चव्हाण याने दारूच्या नशेत संदीपला विनाकारण शिवीगाळ केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. त्या वादातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ११ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर संदीप हा शेजारी मंगेश पाचंगे यांच्या घरासमोर मोबाईल पाहत बसला होता. त्यावेळी प्रमोद चव्हाण हा त्याची आई आणि मुलासह तेथे पोहोचला. काही क्षणांतच संतापलेल्या प्रमोदने लपवून आणलेला लोखंडी कोयता बाहेर काढत संदीपच्या डोक्यावर जोरदार वार केला. Breaking News

 

अचानक झालेल्या या हल्ल्याने संदीप जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मुलाचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या वडील शंकर रसाळ यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिक धावत आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, आरोपींनी जाताना “तुम्हाला परत सोडणार नाही,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. रक्तबंबाळ अवस्थेतील संदीपला प्रथम गावातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे तातडीने स्कॅन करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेमुळे पाटस परिसरात मोठी खळबळ उडाली असून, “किरकोळ वादातून थेट खुनाच्या प्रयत्नापर्यंत मजल कशी जाते?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Lucky Instantly con i Giri Gratuiti di Naobet Casino per i Giocatori Italiani

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.