Thursday, June 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 May 2026, 17:17
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune  पुणे, ता. 13 : विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच पुण्यात एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाह संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका व्यक्तीने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवले आणि तब्बल २१ लाख रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता, पैसे परत देण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीच्या हातात थेट ‘चिल्ड्रन्स बँक’च्या बनावट नोटांची पुडकी ठेवत तिची क्रूर थट्टा केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. Pune

या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय ४१) याला अटक केली असून, त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावर स्वतःची माहिती नोंदवली होती. त्यानंतर तिची ओळख गोरखनाथ गावंडकर याच्याशी झाली. आरोपीने स्वतःचा पालघर येथे रेस्टॉरंट आणि बार व्यवसाय असल्याचे सांगत श्रीमंतीची खोटी प्रतिमा निर्माण केली. सुरुवातीला गोड बोलणे, काळजी घेणे आणि लग्नाची स्वप्ने दाखवत त्याने तरुणीचा पूर्ण विश्वास जिंकला. Pune

 

विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने आर्थिक अडचणी, व्यवसायातील व्यवहार आणि गुंतवणुकीची कारणे सांगत वेळोवेळी तरुणीकडून मोठ्या रकमा उकळण्यास सुरुवात केली. लग्न होणारच आहे, या विश्वासातून तरुणीनेही त्याला पैसे दिले. काही महिन्यांतच आरोपीने तिच्याकडून तब्बल २१ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. Pune

दरम्यान, तरुणीने पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने “मी तुला थेट ५० लाख रुपये देतो,” असे सांगत मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवले. मात्र, जेव्हा त्याने दिलेली बॅग उघडण्यात आली, तेव्हा त्यामध्ये खऱ्या नोटांऐवजी ‘चिल्ड्रन्स बँक’ असे लिहिलेल्या खेळातील बनावट नोटांचे पुडके असल्याचे पाहून तरुणी हादरून गेली. Pune

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, मार्च २०२५ पासून हा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे विवाह संकेतस्थळांच्या माध्यमातून वाढणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “प्रेम, लग्न आणि विश्वास” यांचा आधार घेत सायबर व आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Pune

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.