Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Police News यवत, ता. १३ : पुणे ग्रामीणमधील यवत पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. “तुला बघून घेतो”, “तुझी वर्दी उतरवतो”, “तू यवत पोलीस ठाण्यात कशी नोकरी करतो ते पाहतो,” अशा शब्दांत आरोपीने पोलिसांना उघड धमक्या दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. Yavat Police News

या प्रकरणी विशाल संजय गायकवाड (वय ३८, रा. मानकोबावाडा, यवत, ता. दौंड) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण, दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई भुलेश्वर जनार्दन मरळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १२ मे रोजी यवत परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी पुण्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते. Yavat Police News

याचवेळी एमएच ४२ बीएच ७५६० क्रमांकाची होंडा सीटी ११० दुचाकी भरधाव आणि वेडीवाकडी चालवताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून चौकशी केली असता तो विशाल गायकवाड असल्याचे समोर आले. त्याच्या तोंडातून मद्याचा तीव्र वास येत असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला यवत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. Yavat Police News

 

यवत पोलीस ठाण्यात आल्यानंतर विशाल गायकवाडने संताप व्यक्त करत थेट पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. “मी एसपी ऑफिसमध्ये जातो”, “तुम्ही अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई का करत नाही?”, “तुला उद्या दाखवतो”, “तुझी वर्दी उतरवतो” अशा शब्दांत त्याने पोलिसांना धमकावले. पोलीस कर्मचारी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी अचानक भडकला आणि पोलीस शिपाई भुलेश्वर मरळे यांच्या अंगावर धावून गेला. त्याने मरळे यांची कॉलर पकडत धक्काबुक्की केली. यावेळी त्यांच्या शर्टच्या दोन गुंड्या तुटल्या तर नेमप्लेट जमिनीवर फेकून देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पोलीस ठाण्यात पडलेली काठी उचलून मरळे यांच्या डाव्या हातावर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. Yavat Police News

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे “पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ले होत असतील, तर सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित?” असा सवाल परिसरात उपस्थित केला जात आहे. Yavat Police News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.