Junnar News | पुणे : पिंपळवंडी (ता.जुन्नर) (Junnar )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गावातून चालत निघालेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे ही घटना (ता.२४) रात्री दीडच्या सुमारास घडली.
आदित्य शांताराम गायकवाड असे बिबट्याच्या हल्लात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आदित्य गायकवाड हे रुग्णवाहिका चालक असुन रात्री दीडच्या सुमारास ते पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गावातून चालत निघाले असता,आरोग्यकेंद्राच्या काही मीटर अंतरावर आल्यावर त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु…
अचानक झालेल्या या हल्ल्याने आदित्यने आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला. बिबट्या आकाराने लहान असल्याने मी या हल्ल्यातून बचावलो असे आदित्यने सांगितले. या हल्ल्यात आदित्यच्या हाताला जखम झाली असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु आहे.
दरम्यान, पिंपळवंडी व पंचक्रोशीमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढलेले असतानाच मनुष्यावर देखील बिबट्याने हल्ले सुरु केले असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. तसेच लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
गोडवली येथील तापनेश्वर मंदिर परिसरात झाले बिबट्याचे दर्शन
Shirur News : हरवलेल्या बछड्यांना पुन्हा मातेकडे पोहचविले ; वन विभागाची कामगिरी