Junnar News : पुणे : रक्षाबंधन… भाऊ-बहिणीच्या पवित्र आणि हक्काच्या नात्यातील प्रेम, विश्वास, ऋणानुबंध वाढवणारा सण… राखी बांधण्यासाठी बहिण-भावाचे नाते केवळ रक्ताचेच असले पाहिजे, असे काही बंधन नाही. काही लोकप्रिय भावांना हजारो बहिणींची माया मिळते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जून्नरचे आमदार अतुल बेनके यांना तसाच काहीसा अनुभव आला.
तब्बल १० हजार भगिनींनी बांधली राखी
आमदार बेनके हे आज राखीमॅन बनले आहेत. बेनके यांना जुन्नर तालुक्यातील १० हजारांहून अधिक महिला भगिनींनी राखी बांधली आहे. राखी बांधण्यासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने नारायणगाव येथील आमदार बेनके यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. अतुल बेनके यांनी राखींने भरलेल्या हातांचा फोटो त्यांच्या फेसबूकवर व्हायरल केले आहेत. या फोटोंना अनेकांनी पसंती दर्शवली आहे.
अतुल बेनके यांनी त्यांच्या फेसबूकवर हे फोटो व्हायरल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचा हा लुक पाहावा असाच आहे. (Junnar News) दोन्ही हात राखींनी भरून गेले आहेत. भगिनींची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. भगिनींच्या गराड्यात आमदार सेल्फी घेत आहेत. त्यामुळे भगिनींचा आनंद देखील द्विगुणित झाला आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार बेनके यांनी रक्षाबंधनाची सांस्कृतिक परंपरा कायम राखत एक चांगला सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील महिला भगिनींचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे हे उत्तम व्यासपीठ आमदार अतुल बेनके यांनी उपलब्ध करून दिले आहे. (Junnar News) या कार्यक्रमामुळे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या भगिनींनी आजचा दिवस अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, अशी प्रतिक्रिया अतुल बेनके यांनी व्यक्त केली.
जुन्नर तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या अनेक भगिनींनी नारायणगाव येथील आमच्या निवासस्थानी येऊन मला प्रेमाने आपुलकीने राखी बांधल्या. अतिशय उत्साहात आणि आनंदाने आम्ही रक्षाबंधन सण साजरा केला. या दिवसाची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. बेनके कुटुंब आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद साजरा करण्याचा हा दिवस. दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या या सर्व भगिनींनी यावर्षीचा रक्षाबंधन सोहळा आणखी अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाही. (Junnar News) या जिव्हाळ्याच्या नात्याची कायम जाण ठेवून, सचोटीने, उत्साहाने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा आज मला मिळाली. हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील, याची खात्री देतो, अशी ग्वाही अतुल बेनके यांनी दिली. या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अशी भावना यावेळी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : क्रांती दिनानिमित्त भागुबाई पिंगळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..