राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर : राजूर (ता. जुन्नर) येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये जागतिक हृदय रोग दिनी १०० रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब व रक्त तपासणी करण्यात आली. या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लुपिन फाऊंडेशन, राजूर ग्रामपंचायत यांच्या सहयोगाने करण्यात आले आयोजन
कार्यक्रमामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, नारायणगाव येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष बोळीज व जुन्नर येथील डॉ. दयानंद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी शिबिराचे समन्वयक डॉ. गोसावी यांनी मार्गदर्शन व उपचार केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी आरोग्यवर्धानी केंद्र, राजूर व तालुक्यातील इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (Junnar News ) शिबिरात १०० रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब व रक्त तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे देखील यशस्वी आयोजन करण्यात आले.
शिबिरासाठी लुपिन फाऊंडेशन, राजूर ग्रामपंचायत, सरपंच मुंढे यांचे सहकार्य लाभले. (Junnar News ) या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके बनले हजारो बहिणींचे भाऊराया…