job alert : पुणे : चांगली नोकरी मिळावी असे सगळ्यांनाच वाटत असतं. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबई येथील कौटुंबिक न्यायालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे सफाईगार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज 22 डिसेंबर 2023 पासून सुरू झाले आहेत. तर 1 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरती अंतर्गत एकूण चार पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सफाईगार.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वयोमर्यादा : 33-38 वर्षे.
– वेतन / मानधन : 15, 610
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 22 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जानेवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कौटुंबिक न्यायालय, मुंबई नवीन प्रशासकीय इमारत, बी-विंग, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ पूर्णकालिक.
याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://districts.ecourts.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.