Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची 2024’ साठी सदिच्छा दूत म्हणून फुलचंद नागटिळक यांची निवड

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Friday, 29 December 2023, 23:31
chokhoba to tukoba ek wari samtechi phulchand nagtilak

पुणे: संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यातून होणार असून समारोप जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या देहूगाव येथे होणार आहे. संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

‌‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२३’चे यंदाचे ६ वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, माकणी, उमरगा, नाईचाकूर, औसा, लातूर, तेर, धाराशिव, कसबे तडवळे, येरमाळा, वाशी, भूम, पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, बोधेगाव, पैठण,संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे देहूगाव येथे जाणार आहे. ही वारी ८ जिल्ह्यातून १३५० किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. संतांनी सांगितलेल्या समता, बंधूता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गाव, शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करण्यात येणार आहे.

सदरील समता वारीचे सदिच्छादूत म्हणून प्रती गाडगेबाबा समाज प्रबोधनकार आणि कवी फुलचंद नागटिळक यांची निवड करण्यात आल्याचे समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी सांगितले.

 

कोण आहेत फुलचंद नागटिळक?

फुलचंद नागटिळक गाडगेबाबांचा वेश परिधान करून गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. गेली पंचवीस वर्षापासून खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा संत गाडगेबाबा यांचा वेश परिधान केला आहे. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा, शिक्षण, शेती, पर्यावरण रक्षण यातील समस्या दूर करण्यासाठी राष्ट्र संत गाडगेबाबांच्या मार्गांचा अवलंब करत आहेत. फुलचंद नागटिळक यांच्या वारीतील सहभागाने वारीचा विचार समाजापर्यंत जाण्यासाठी मदत होणार आहे .

 

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36
Next Post

job alert : मुंबई येथील कौटुंबिक न्यायालयात 'या' पदासाठी निघाली भरती; पगारही चांगला, लवकर करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.