शिक्रापूर : शिरसगाव (ता.शिरूर) येथे अर्धवट दरवाजा उघडा असलेला पाहून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश केला. त्यावेळी घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्प्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे 1 लाख, 78 हजार रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले. ही चोरीची घटना 8 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष भिकोबा कदम (वय 70), (धंदा शेती, रा.मानेवाडी, शिरसगाव काटा शिरूर जि. पुणे) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. दि. 08 ऑगस्ट रोजी रात्री 12 ते दि. 09 ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या दरम्यान कदम यांच्या अर्धवट दरवाजा उघडा असलेला पाहून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्प्यात ठेवलेला एकूण 1,78,000 /- रूपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये 95 हजार रु. किमंतीचे 19 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, 15 हजार रु किमंतीचे 3 ग्रॅमचे गळयातील डोर्ले, 5 ग्रॅम वजणाची पिळयाची 25 हजार रु किमंतीची अंगठी, 15 हजार रु किमंतीची 3 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, 15 हजार रु किमंतीचे 3 ग्रॅम गळयातील मणी, साडेसात हजार रु किमंतीचे दीड ग्रॅम गळयातील डोर्ले, अडीच हजार रु किमंतीची अर्धा ग्रॅम नाकातील चमकी, 3 हजार रु. किमंतीचा चांदीचा पायातील जोडवी जोड असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे.
यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.