Jejuri News : जेजुरी : शिवरी (ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब बबन कुंजीर यांनी मागील पाच वर्षांत कोणत्याही वर्गाला स्वतंत्रपणे शिकविण्याचे काम केले नाही. या काळात काम न करता त्यांनी विनाकामाचा पगार घेतला. कुंजीर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी कुंजीर यांचे निलंबन केले. तर याच शाळेचे केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांनी कुंजीर यांच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करून, अप्रत्यक्षपणे शासनाची फसवणूक करण्यास मदत केली. वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे पाठवला नाही, असा ठपका ठेवून जगदाळे यांच्यादेखील दोन वेतनवाढी रोखण्याची शिफारस केली.
केंद्रप्रमुखाचेही वेतन रोखले
शिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंजीर यांची २०१८ मध्ये बदली झाली. तेव्हापासून कुंजीर यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करीत मागील पाच वर्षांत कोणत्याही वर्गाला स्वतंत्रपणे शिकविले नाही. या काळात त्यांनी विनाकामाचा पगार घेतला. (Jejuri News) त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य, शिक्षण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना हाताशी धरून पाच वर्षे विद्यार्थ्यांना न शिकवता पगार घेत आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी २० जुलै २०२३ रोजी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या.
गेली पाच वर्षे कुंजीर यांनी घेतलेल्या विनाकामाच्या पगाराची वसुली व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, प्रशासन जाणीवपूर्वक चौकशीसाठी टाळाटाळ करत होते. पंचायत समिती स्तरावर तक्रार अर्ज करूनही पंचायत समितीकडून कोणतीही चौकशी झाली नव्हती. (Jejuri News) अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करत असून कुंजीर यांना खोटे दस्तावेज तयार करण्यास वेळ देत असल्याची नागरिकांची तक्रार होती. केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांनीही कुंजीर यांच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करून अप्रत्यक्ष त्यांना शासनाची फसवणूक करण्यास मदत केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी व माहिती अधिकार कार्यकर्ते देवानंद लिंभोरे यांनी राज्याचे शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व पुणे जिल्हा परिषदेकडे चौकशीची मागणी केली होती.
या मागण्यांचा विचार करून, आणि सत्य परिस्थिती जाणून गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी पुरंदरचे शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे व अनिल गायकवाड यांना बाळासाहेब कुंजीर व अनिल जगदाळे यांच्या बाबतीत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करण्याचे आदेश दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jejuri News : सनई-चौघड्यांच्या निनादात खंडेरायाच्या जेजुरी गडावर नवरात्रोत्सवाचा उत्साह
Jejuri News : कोयत्याने वार करून दुचाकीस्वारावराची लूट; आरोपीला पिंगोरीतील शेतातून अटक