पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. सदर बदल्यांचे आदेश मंगळवारी 16 जानेवारीला काढले आहेत. सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या या केंद्रीय निवडणूक आयोग आणि पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.
बदल्या झालेल्या सहायक पोलीस आयुक्तांची नावे …
- मच्छिंद्र रामचंद्र खाडे – (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (प्रशासन) ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (परिमंडळ-1)
- नारायण देवदास शिरगावकर – (सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (प्रशासन)
- अशोक विश्वासराव धुमाळ – (सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग ते सहायक पोलीस आयुक्त, अभियान)
- रुक्मिणी मनोहर गलंडे – (सहायक पोलीस आयुक्त, अभियान ते सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग)
- अजय सुभाष चांदखेडे – (नव्याने हजर ते सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन)
- नंदा राजेंद्र पाराजे (मंदीनी वग्यानी) – (सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन ते सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग)
तसेच आस्थापना सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ बापू उंडे यांच्याकडे सहायक पोलीस आयुक्त, अभियान या पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आला आहे.
सहायक पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत कार्यभार स्वीकारून अनुपालन अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह पोलीस आयुक्तलायत सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.