दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील एक चमत्कार आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा अद्वितीय असा उत्सव असून, विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.23) काढले. तसेच पालखी सोहळा हा महाराष्ट्राचे वैभव असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील यांचा पायी चालत सोहळ्यात सहभाग
हर्षवर्धन पाटील यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात शुक्रवारी इंदापूर ते बावड्यापर्यंत पायी चालत सोहळ्यात सहभाग घेतला. (Indapur News) याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
राज्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, नागरिक व समाजातील सर्वच घटक चिंतेत आहेत. मान्सूनचा पाऊस अजून चालू झालेला नाही, त्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. (Indapur News) त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी व संत तुकाराम महाराजांच्या चरणी समाधानकारक पाऊस होऊन, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
आमचे घराण्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, सदरची परंपरा आम्ही पुढे चालवीत आहोत, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, पालखी सोहळ्यामध्ये हरिनामाचा गजर व निस्सीम भक्ती आहे.(Indapur News) पालखीमध्ये वारकऱ्यांसमवेत पायी चालताना मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, अशी भावना प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : मृत चित्रबलाक पक्षांना इंदापूरकरांनी वाहिली श्रद्धांजली