Indapur News : वालचंदनगर : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे १२० फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह शोधण्यात अनेक अडथळे येत होते. विहिर अधिक खोल असल्याने मलबा हटविण्यास वेळ लागत होता. आज (ता. ४) अखेर दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास चारही मजूरांचे मृतदेह हाती लागले. मृत्यू पावलेले चारही मजूर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याने, गावावर शोककळा पसरली आहे.
बेलवाडी गावावर शोककळा
बेलवाडी (ता. इंदापूर) येथील संत तुकाराम महाराज पालखी तळाजवळील तुकारामनगर वस्ती वसविली आहे. येथील अतिक्रमणे हटविल्याने शेजारीच गायरान जमिनीवर पत्रा शेडमध्ये अनेक कुंटूबे मोलमजुरी करून राहतात. येथील सुमारे १२ मजूर विहिरीला रिंग करण्याचे काम करीत होते. (Indapur News ) सुदैवाने यातील आठ जण पोर्णिमा असल्यामुळे देवदर्शनासाठी गेले होते. कामावर गेलेले सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०, मूळ रा. बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३०) व लक्ष्मण ऊर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे मंगळवारी घरी परतले नसल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली होती.
दरम्यान, दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीमध्ये कोसळले. त्यांच्या अंगावर मुरुम व माती पडल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली. घटनेनंतर रात्री लगेच बचाव कार्याला सुरवात झाली. (Indapur News ) आज शोध मोहिमेचा चौथा दिवस होता. चार दिवसांमध्ये पोकलेन मशिनच्या साहय्याने विहिरीच्या परिसरातील माती व मुरुम हटवली. विहिरीतील पाणी व मलबा हटविल्यानंतर चार मजुरांचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले.
मृत्यू पावलेले चारही मजूर एकाच गावातील होते. ही दूर्घटना घडल्यानंतर संपूर्ण गावच गेल्या तीन दिवसांपासून शांत झाले होते. (Indapur News ) एकाच गावातील चौघांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. गावातील सर्व दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : म्हसोबावाडीची विहीर दुर्घटना दुर्दैवी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील;