Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : हडपसर येथे डान्स क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या क्लासचालकाला अटक ; हडपसर-सासवड रस्त्यावरील एका लॉजवर मुलीच्या आईनेच पकडले होते रंगेहाथ…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 August 2023, 13:40

Big News  लोणी काळभोर : डान्स क्लासमध्ये डान्स शिकण्यासाठी आलेल्या अवघ्या १५ वर्षीय मुलीला फसवून, हडपसर-सासवड मार्गावरील एका लॉजवर नेऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हडपसर हद्दीतील काळेपडळ परिसरातील स्वरुपम डान्स अॅकडमीचा चालक सुशील राजेंद्र कदम (वय ३२, रा. गोपाळपट्टी, यशोप्रभा सोसायटीशेजारी, मांजरी बुद्रुक) या गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधमाला हडपसर पोलिसांनी गुरुवारी (ता. ३) रात्री उशीरा अटक केली आहे. (Big News)

काळेपडळ परिसरातील स्वरुपम डान्स अॅकडमीचा चालक सुशील कदम हा गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्याच डान्स क्लासमधील एका १५ वर्षीय मुलीला फसवून हडपसर-सासवड मार्गावरील दिवे गावच्या एका लॉजवर घेऊन गेला होता. ही बाब लक्षात आल्याने मुलीच्या आईने सुशील कदम व अल्पवयीन मुलीला थेट लॉजवर जाऊन पकडल्याने, वरील प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याने सुशील कदम याच्या विरोधात ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटकही केली आहे.  (Big News)

मांजरी बुद्रुक हद्दीतील सुशील कदम हा ३२ वर्षीय तरुण हडपसर परिसरातील काळेपडळ येथे मागील काही वर्षांपासून स्वरुपम डान्स अॅकडमी नावाचा डान्स क्लास चालवतो. याच क्लासमध्ये ही १५ वर्षीय पिडीत मुलगी डान्स शिकण्यासाठी येत होती. सुशील कदम याने काल (गुरुवारी) दुपारी संबंधित मुलीशी गोड बोलून हडपसर-सासवड मार्गावरील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, मुलगी वेळेत घरी का आली नाही, याचा शोध घेत असताना मुलीच्या आईला सुशील कदमबद्दल संशय आला. या संशयातून सुशील कदमचा ठावठिकाणा शोधताना मुलीच्या आईने थेट हडपसर-सासवड मार्गावरील कदम व मुलगी ज्या लॉजवर गेले होते, तो लॉज शोधून काढला. (Big News)

 

दरम्यान, दोघेही लॉजवर पकडले जाताच, सुरवातीला गयावया करणाऱ्या सुशील कदम या नराधमाने मुलीला व तिच्या आईला दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती सासवड पोलिसांना मिळताच, सासवडचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. सासवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. तसेच मुलीला फसवून लॉजवर नेणाऱ्या सुशील कदमच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्याची तयारी सुरु केली. मात्र, प्रकरणाची सुरुवात हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे सोपवले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करुन, आरोपीला अटकही केली. (Big News)

अल्पवयीन मुलीला प्रवेश; लॉजवर गुन्हा दाखल होणार..

दरम्यान, पिडीत मुलगी अल्पवयीन असताना सुशील कदमसोबत मुलीला लॉजमध्ये प्रवेश दिलाच कसा, असा प्रश्न या गुन्ह्याच्या निमित्ताने पुढे आला आहे. अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देणाऱ्या हडपसर-सासवड मार्गावरील सर्वच लॉजवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याही प्रकरणात सुशील कदम बरोबरच संबधित मुलीला प्रवेश देणाऱ्या लॉजमालकावरही पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. (Big News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Indapur News : १२० फूट खोल विहिरीत पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह चौथ्या दिवशी सापडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.