दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याकडून आगामी गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऊस बिलाचा पहिला हप्ता २५०० रुपये याप्रमाणे दिला जाईल, त्यानंतरचे ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आगामी गळीत हंगामात ऊस दरात आघाडीवर राहील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता. ३०) दिली.
तोडणी व वाहतूकीची सर्व बीले वेळेवर देणार
कर्मयोगी कारखाना चालू गळीत हंगामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी ९ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण करेल. (Indapur News) त्या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले असून, कारखान्याची सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून, गळीत झालेल्या ऊसाची तसेच तोडणी व वाहतूकीची सर्व बीले वेळेवर व काटेकोरपणे हंगाम संपेपर्यंत दिली जातील.
कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला नियमितपणे होत असून, दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. (Indapur News) या वेळी वसंत मोहोळकर, पराग जाधव, प्रदीप पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे, अंबादास शिंगाडे, भूषण काळे, राहुल जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : गलांडवाडी अपघातानंतर ट्रक पेटवल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल
Indapur News : दसऱ्याची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकची धडक; जागीच ठार