पुणे: गृह मंत्रालयाने (एमएचए) ७ मे रोजी देशव्यापी नागरी संरक्षण मॉकड्रील आयोजित करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने अनेक राज्यांना ७ मे (बुधवार) रोजी नागरी संरक्षण सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात १६ ठिकाणी सायरन वाजणार असून पुण्यात ७५ ठिकाण सिव्हील डिफेंस एरियामध्येही लष्कर मॉकड्रिल करणार आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संभाव्य धोके आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिकांना आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांना तयार करणे हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावात हवाई हल्ला सायरन, निर्वासन सराव आणि शत्रुत्वाच्या हल्ल्यांना प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे यांचा समावेश असेल. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाच्या तयारी संदर्भात बैठका होतील. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या सरावात सहभागी होण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे नागरिकांना माहित असावे हा या मॉक ड्रिलचा उद्देश आहे.
शेजारील देशांसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा हा मॉक ड्रिल एक भाग आहे. , पुण्यात ७५ ठिकाण सिव्हील डिफेंस एरियामध्येही लष्कर मॉकड्रिल करणार आहे. नागरी संरक्षण महासंचालनालय, राज्य पोलिस, एनसीसी, एनवायकेएस आणि शाळा/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध एजन्सींच्या सहभागाने हा सराव आयोजित केला जाईल. मॉक ड्रिलमध्ये इशाऱ्याचे सायरन वाजवणे. क्रॅश ब्लॅक आउट उपायांची तरतूद, हल्ला झाल्यास बचावाच्या कार्याचा सराव इत्यादीचा सराव करून घेतला जाणार आहे.