प्रदिप रासकर / निमगाव भोगी : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ पुणे यांच्या मार्फत गट विकास अधिकारी शिरूर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. दरम्यान, केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास शिरूर पंचायत समिती समोर 25 ऑक्टोबर रोजी शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी शंख ध्वनी बोंबठोक आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन करूनही मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या विधानसभा मतदानावर ग्रामपंचायत कर्मचारी कुटुंब व नातेवाईक मतदानावर बहिष्कार घालणार आहे.
काय आहेत मागण्या?
- कर्मचारी यांना दिवाळी बोनस तात्काळ मिळावा व किमान वेतनाच्या अनुदानाची तीन महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.
- कर्मचारी यांचा 2007 पासून थकबाकी कर्मचारी भत्ता तात्काळ मिळावा.
- कर्मचारी यांना भर पावसात काम करावे लागत आहे, यासाठी रेन कोट, छत्री, बॅटरी, सेफ्टी शूज या वस्तू ग्रामपंचायत कर्मचारी यांना तात्काळ द्याव्यात.
- १९ महिन्यांची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करा.
- एप्रिल ते जून २०२४ या तीन महिन्यांचे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे, त्यांचे वेतन ऑगस्ट महिन्याच्या वेतनाबरोबर जमा करण्यात यावे.
- ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एप्रिल २०२४ चे प्रलंबित वेतन एप्रिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
- ग्रामपंचायतीकडील शिल्लक वेतन हिस्सा, भविष्य निर्वाह निधी हिस्सा व राहणीमान भत्ता कर्मचारी यांना दिल्याबाबत पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतनिहाय चौकशी करणे.
- शासन निर्णय १० जानेवारी २०२४ नुसार १० ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील १९ महिन्यांची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करण्यात यावे.