पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये अनेक भागांमध्ये गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार असून त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. पुणे महागर पालिकेकडून यासंदर्भात नागरिकांना सूचना देण्यात आलाय आहेत. त्यामुळे बुधवारीच पुणेकरांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला, पर्वती, वारजे, भामा आसखेड, कोंढवे धावडे आदी ठिकाणच्या जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या आदी ठिकाणी तातडीच्या विद्युत, पंपींग आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीचे काम पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाणार आहे.
गुरूवारी शहराच्या मध्यवर्ती भाग, पूर्व, पश्चिम भागासह बहुतांश भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा होणार नसल्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.
‘या’ भागात असणार पाणी पुरवठा बंद..
- वडगाव जलकेंद्र परीसर
- चतुःशृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर
- एसएनडीटी जलकेंद्र परिसर
- गांधी भवन टाकी परिसर
- चांदणी चौक परिसर जलकेंद्र
- नवीन होळकर व चिखली पंपींग भाग
- लष्कर जलकेंद्र भाग