गोरख कामठे
हडपसर, (पुणे) : फुरसुंगी परिसरात मागील काही दिवसांपासून सकाळी व्यायाम करण्यासाठी, मॉर्निंग वॉक तसेच सायकलिंग करणाऱ्या नागरिकांना तरस प्राण्याचे दर्शन होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा तरस प्राणी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी परिसरात दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सध्या सोशल मिडीयावर तरस या प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील गांधनखिळा, सदाशिव नगर परिसरात सकाळी अनेक लोक व्यायाम करण्यासाठी, मॉर्निंग वॉक तसेच सायकलिंगसाठी बाहेर पडत असतात. यावेळी मॉर्निंग वॉक करत असताना महेंद्र सरोदे, कैलास सरोदे, तानाजी अडागळे, रविंद्र हरपळे, जीवन पवार, गोरख कामठे यांना हा तरस दिसला.
दरम्यान, अनेक दिवसांपासून या परिसरात तरस प्राणी दिसून येत आहे. तसेच लोकवस्ती असलेल्या फुरसुंगी, गाधंनखिळा, सदाशिव नगर परिसरात वारंवार तरस नजरेस पडत आहे. तरस हा आता नागरिकांना दिवसाढवळ्या दिसू लागल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
View this post on Instagram