HSC 12th Result 2023 | पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च –एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.
पाहा विभागनिहाय निकाल ….
पुणे : 93.34 टक्के, नागपूर : 90.35 टक्के, औरंगाबाद : 91.85 टक्के, मुबई : 88.13 टक्के, कोल्हापूर : 93.28 टक्के, अमरावती : 92.75 टक्के, नाशिक : 91.66 टक्के, लातूर : 90.37 टक्के, कोकण : 96.01 टक्के
कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल: 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई: 88.13 टक्के.
बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 2 नंतर उपलब्ध होणार आहेत.
बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ( maharashtra board 12th result links )
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा चेक करा तुमचा निकाल ; ( how to check maharashtra board 12th result )
स्टेप 1) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप 2) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics News : बेकायदी नियुक्ती हे मत निकाल नाही ; भरत गोगावले
Pune News : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन