Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव – खामगाव टेक (Hingangaon – Citizens of Khamgaon Tek) (ता. हवेली) येथे मुळा मुठा (Mula Mutha river basin) नदीवर मोठा पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी खामगाव टेक, टिळेकरवाडी, हिंगणगाव, सह पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी १ मे (१ May) महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) मुळा मुठा नदी पात्रात जलसमाधी ( jalsamadhi protest in the Mula Mutha river ) आंदोलन केले. यावेळी आंदोलक अंकुश बापूराव कोतवाल यांनी नदीत उडी मारुन जलसमाधी ( jumping into the river) घेण्याचा प्रयत्न केला.
लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand Police) पोलीस कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ( Public Works Department) अधिकारी वर्गाने मध्यस्थी करून त्यांना स्थानिकांच्या मदतीने अंकुश कोतवाल ( Ankush Kotwal) यांना पाण्यातून बाहेर काढून पुढचा अनर्थ टाळला. (averted further calamity) मात्र आंदोलकांचा मनसुबा काही अंशी पूर्ण ( plan has been fulfilled to some extent) झाला आहे. (Uruli Kanchan News)
महायुती सरकारच्या काळात पूल बांधण्याची मंजुरी
महायुती सरकारच्या काळात हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुळा मुठा नदीवर पूल बांधण्याची मंजुरी मिळाली होती. या संदर्भात ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठरावही शासनाकडे पाठविले आहेत. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले नसल्याने पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह नागरिकांनी आंदोलन केले.
मुळा मुठा नदीवर हिंगणगाव येथे पूल बांधण्याची मागणी या परिसरातील हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, मिरवडी शिंदेवाडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस व उरुळी कांचन या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत मासिक सभांमध्ये ठराव मंजूर करून घेऊन या मागणीसाठी सन २०१३ पासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा प्रश्न अद्याप पर्यंत भिजत ठेवला आहे, गेल्या सुमारे दहा वर्षाच्या काळात वेगवेगळ्या पातळ्यांवर या पुलाच्या बांधकामासाठी मागणी पाठपुरावा करून देखील लोकप्रतिनिधी व प्रशासन याची दखल घेत नाही म्हणून जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.
मुळा मुठा नदीवर हिंगणगाव येथे पूल बांधण्याची मागणी हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, मिरवडी शिंदेवाडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस व उरुळी कांचन ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठरावही शासनाकडे पाठविले आहेत. या नियोजित पुलामुळे नगर रोड, सातारा रोड आणि सोलापूर रोड हे तीन महामार्ग कमी अंतराच्या प्रवासाने जोडले जाणार आहे. जेजुरी, रांजणगाव, मोरगाव, थेऊर आदी तीर्थक्षेत्रे कमी वेळात जोडली जाणार आहेत. पंचक्रोशीतील विद्यार्थी कामगार शेतकरी यांना दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध होऊन त्यांचा १२ किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे संयोजक, हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमधील नागरिकांनी १ हे या महाराष्ट्र दिनीच जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले.
यावेळी उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, मारुती थोरात, संदीप जगताप, सागर शेलार, कुंडलिक थोरात, रोहिदास टिळेकर, प्रेमजी थोरात, दत्तात्रय थोरात, भाऊ थोरात, बाबासाहेब चौरे, विजय गायकवाड भरत गडदे, नानासाहेब शिंदे, मोहन शिंदे, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सरपंच मारुती थोरात यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील भाविकांना तुळजापूर येथे घेऊन गेलेल्या वाहनचालकाला मारहाण..