पुणे : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पारा चढला असून सर्वत्र कोरडे हवामान दिसत जाणवत आहे. गारवा कमी होऊन होऊन उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढलेला दिसून येत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात ‘कसे’ असेल तापमान?
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके असू शकते. आज ९(फेब्रुवारीला) पुण्यामत निरभ्र आकाश असेल. पुण्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने उष्णतेत वाढ होणार आहे.
सातारा-सांगलीत कसे असेल हवामान?
आज ९ फेब्रुवारीला साताऱ्यामध्ये देखील निरभ्र आकाश असेल. साताऱ्यातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसात साताऱ्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. सांगलीमध्ये देखील निरभ्र आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सांगलीमधील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवतील.
सोलापूर व कोल्हापूर मधीलही तापमानात वाढ?
हवामान विभागानुसार, सोलापूरमध्ये आज निरभ्र आकाश असेल. येथील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१अंश सेल्सिअस इतके असू शकते. हवामान विभागानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांच्या तुलनेत सोलापूर मधील कमाल आणि किमान तापमानात सर्वाधिक वाढ झालेली दिसून येत आहे. तर कोल्हापूरमधील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे निरभ्र आकाश असेल. कोल्हापूरमध्ये देखील कमाल आणि किमान तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे.
एकंदरीत मागील काही दिवसापासून राज्यातील पारा चढल्याचे जाणवत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्येही कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली निदर्शनास येत आहे.