पुणे : पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही नाशिक, कोकण, मुंबई, विदर्भ भागातील काही परिसरात पाऊस सुरूच आहे. मात्र पुणेकरांसाठी आता दिलासादायक बातमी आहे.
येणाऱ्या दोन दिवसामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. काल पावसाचा जोर कमी झाला होता. शहरात 10.4 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
यंदा पुणे शहरात आतापर्यंत सरासरीपेक्षा 33 टक्के अधिक पाऊस पडला. जुलै महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.
दरम्यान आज पुणे व परिसरात मध्यम सरी तर घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उद्या शनिवारपासून शहर व परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.