अरुण भोई
स्वामी चिंचोली: स्वामी चिंचोली दौंड येथील कोविड सेंटरमधील ७५ बेड आणि इतर साहित्य चोरीला गेले होते. या संदर्भात शिवसेना उप तालुकाप्रमुख रमेश पवळ यांनी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, मंगळवारी (दि.१९) संबंधित कोविड सेंटरमध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह भेट देऊन चौकशी केली.
आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी कोविडच्या काळातील कर्मचारी मात्र उपस्थित नव्हते. याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, या कोविड सेंटरमधील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा मागवला आहे.