इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजास विविध योजनांच्या माध्यमातून, व्यवसायासाठी अनुदान, व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत, अल्पसंख्यांक समाजासाठी भरघोस विकास निधी मदत मिळण्याबाबत इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेत निवेदन दिले.
निवेदन स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, आजपर्यंत जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण केली आहे आणि भविष्यातही अल्पसंख्याक समाजासाठी जेवढी शक्य होईल तेवढी मदत करणार आहे. तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना केंद्र व राज्य सरकारने सुरू केले आहे. या योजनेचा लाभ आपल्या तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेत प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे अनेक कुटुंबीयांचे उदरनिर्वाह
हर्षवर्धन पाटील हे सातत्याने मुस्लिम समाजाला विविध माध्यमातून मदत करत असतात. तालुक्यातील शेकडो तरुणांना त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी देत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह होत आहे, असे सलीम सय्यद यांनी म्हटले आहे.