Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुक्तसाहेब, गुंडगिरीबरोबरच हडपसर ते उरुळी कांचन दरम्यानच्या वाहतूक कोंडीवरही सर्जिकल स्ट्राईक करा, पुर्व हवेलीमधील नागरिकांची मागणी

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Sunday, 11 February 2024, 19:02

लोणी काळभोर, ता.11 : पुणे-सोलापूर महामार्गावर आकाशवाणी (हडपसर) ते उरुळी कांचन दरम्यान मागील दहा वर्षांपासून वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला अगदी रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महामार्गावरच चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे आणि दारू पिऊन गाडी चालविणे अशा विविध गोष्टींमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

बेशिस्त वाहतूक व चौकाचौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे हडपसर (आकाशवाणी)- कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी या दरम्यान छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दहा वर्षांचा विचार केल्यास, या मार्गावर किमान आठशेहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. चौकांमधील वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच या मार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर निंयत्रण ठेण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलिस वाहतूक नियमणाचे मुळ काम सोडुन वेगळ्याच कामात गुंतल्याचे दिसुन येत आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे, गुंडगिरी आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी व या कोंडीला कारणीभूत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नातकर्तेपणावर सर्जिकल स्ट्राईक करावा, अशी मागणी पुर्व हवेलीमधील नागरीकांनी केली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर हद्दीत आकाशवाणी, १५ नंबर चौक, शेवाळवाडी व फुरसुंगी फाटा या चौकात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसुन येते. तर लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत लोणी स्टेशन चौक, एमआयटी कॉर्नर, लोणी कॉर्नर, थेऊर फाटा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही बाब नित्याचीच ठरलेली आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांच्या हद्दीत ऍलाईट चौक व तळवडी चौक हे वाहतूक कोंडीचे मोठे हॉटस्पॉट बनले आहेत. लोणी स्टेशन चौकात वाहतूक पोलिस फक्त वरीष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी चौकात उपस्थित रहातात की काय अशी परीस्थिती आहे. एमआयटी कॉर्नरला तीन वाहतूक पोलिस असूनही त्या ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघात वाढत असल्याचे दिसुन येत आहे. एमआयटी कॉर्नरला असणारे पोलिस कर्मचारी एकाच ठिकाणी थांबून वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीसाठी सावज शोधण्याचे काम करीत असतात.

 

एक आदमी साला…
हडपसर गावच्या हद्दीत हडपसर गाव ते पंधरा नंबर या दरम्यान रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे पुण्याहून उरुळी कांचनकडे जाणाऱ्या बाजूच्या लेनवर दररोज वाहतूक कोंडी होते. लग्नसराई, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या काळात तर रस्त्यात थांबलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे दोन-दोन तास वाहतूक ठप्प होते. हडपसर परीसरातील एका नेत्याच्या हट्टामुळे व खाजगी ट्रॅव्हल्स, अवैध प्रवासी करणाऱ्या मोठ्या गाडीवाल्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक मायेमुळे हडपसर व वाहतूक अशा दोन्ही पोलिस यंत्रणा या मोठ्या गाड्यांना रस्त्यात थांबू देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील कोंडीबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने या ठिकाणी पोलिस आयुक्तांनी सर्जिकल स्ट्राईक करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

‘सात’च्या आत सुखरूप घरात, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांचे नवीन धोरण
पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत असणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांची ड्युटी बारा तास असल्याचे बोलले जाते. मात्र, शहर वाहतूक पोलिसांचाच एक भाग असलेले लोणी काळभोर वाहतूक विभाग मात्र याला अपवाद असावा, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. लोणी काळभोर वाहतूक पोलिस दलातील ठराविक कर्मचारी आपल्या नेमलेल्या जागेवर त्यांच्या वेळेनुसार हजर राहत असल्याचे दिसुन येते. मात्र, सकाळी नऊ वाजता सेल्फी काढून पाठवला की अनेक महाभाग आपआपल्या कामासाठी निघून जात असल्याचे चित्र आहे. लोणी स्टेशन चौक व एमआयटी कॉर्नर या ठिकाणी वाहतूक नियमन नावालाच उरले असून अनेक पोलिस कर्मचारी सात वाजण्यापूर्वीच नेमलेल्या जागा सोडून जातात. यामुळे लोणी स्टेशन चौक व एमआयटी कॉर्नरला रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची गरज असतानाही पोलिसांनी मात्र ‘सात’च्या आत सुखरूप घरात हे धोरण स्वीकारले आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

थेऊर पाट्यावरील वाहतूक पोलिस आडोशाला अथवा वसुलीला..
लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या हद्दीतील थेऊर फाटा हा परीसर सध्या वाहतूक कोंडीचा मोठा स्पॉट बनला आहे. या ठिकाणी नेमणुकीस असणारे बहुतांश पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचे चित्र आहे. तर काही पोलिस कर्मचारी थेऊर फाटा उड्डाणपुलाच्या एका कोपऱ्यात थांबून वसुलीवर भर देत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. थेऊरकडून येणाऱ्या वहानांना पोलिसांचा टोल दिल्याशिवाय पुलावर चढताच येत नाही. थेऊर फाट्यावर पोलिसांनी वाहतूक नियमनाकडे लक्ष दिल्यास अनेक अपघात कमी होतील, अशी परीस्थिती आहे.

आयुक्तसाहेब, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक खरंच करा…
पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे, गुंडगिरीवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे जाहीर केले आहे. त्या दिशेने पाऊलेही टाकण्यास सुरुवात केली आहे. ही बाब नागरिकांना सुखावणारी आहे. मात्र, शहरातील अवैध धंदे, गुंडगिरीबरोबरच हवेलीच्या पुर्व भागातील नागरीकांना दररोज भेडसावणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी व या कोंडीला कारणीभुत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नातकर्तेपणावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील एका वर्षात कवडीपाट ते उरुळी कांचन या दरम्यान झालेल्या विविध अपघातात सत्तरहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुणे-सोलापुर महामार्गावरील कोंडीबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. पुणे शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मागील पंधरा दिवसांतील कामगिरी पहाता आमच्याही भागातील अवैध धंदे, गुंडगिरीबरोबरच वाहतूक कोंडीवर आयुक्तसाहेब, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक खरंच करा, अशी म्हणण्याची वेळ पुर्व हवेलीमधील नागरिकांवर आली आहे.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

नकली बंदुकीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.