Hadapsar Railway Station | पुणे : हडपसर स्थानकाच्या विकासासाठी रेल्वे बोर्डाने तब्बल १३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता या स्थानकाचा कायापालट होणार असून रेल्वे प्रवास सुसाट होणार आहे.तसेच, या निधीतून ५० कोटी रुपये किमतीच्या जागेचे संपादन होणार आहे. अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.
नवीन तीन इमारती…
नवीन तीन इमारती, प्रवाशांना बसण्यासाठी वेटिंग रूम, राहण्यासाठी रिटायरिंग रूम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, छोटेसे कॅन्टीन, प्रशस्त पार्किंग, फलाटावर पूर्ण कव्हर्ड शेड यांसह अन्य सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांत स्थानकाच्या विकासाचे काम सुरु होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास होणे गरजेचे आहे. पूर्वी यासाठी १७ कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र अर्धा हेक्टर जमिनींसाठीच तब्बल ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाला १३६ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव दिला होता. त्याला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे हडपसर टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सिग्नलिंग यंत्रणा उभारणे….
रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गती-शक्ती युनिटची स्थापना केली आहे. आता हेच युनिट हडपसर टर्मिनलचा विकास करणार आहे. स्थानकाच्या विकासासह येथे दोन नवीन स्टेबलिंग लाईन बांधणे, सिग्नलिंग यंत्रणा नव्याने उभारणे यांसह अन्य कामे केली जाणार आहेत. भू-संपादनासाठी १० तुकड्यांमध्ये जमीन रेल्वे प्रशासन ताब्यात घेणार आहे. राज्य सरकारकडून त्याची मोजणी सुरु आहे. भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात जमीन रेल्वेच्या ताब्यात येण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, त्या दरम्यान रेल्वे प्रशासन प्रवासी सुविधांच्या कामाला सुरवात करणार आहे.
असा होणार हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट….
– स्थानकाच्या समोर असलेली रेल्वे कर्मचाऱ्यांची घरे पाडून तिथे पार्किंग व रस्ता
– आरआरआय केबिन, तसेच स्थानक व्यवस्थापकाचे कार्यालय
– स्टेबलिंग लाइनसाठीची जागा खरेदी करण्याचे प्रयत्न
– दौंडच्या दिशेने असलेल्या फलाटाजवळून रस्ता तयार करणार. त्यामुळे स्थानकाला दोन्ही बाजूने प्रवेश मिळणार
– दुसऱ्या बाजूने स्थानकावर प्रवेश मिळणार असल्याने प्रवाशांना खराडीच्या पुलाचा वापर करून फिरून येण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होईल
– स्थानकावर प्रतिक्षालयासह स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सोय
– स्थानकावर तीन नव्या इमारती. यात प्रवाशांसाठी वेटिंग रूम, रिटायरिंग रूम, क्लॉक रूम
प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंग…
– स्थानकावर सरकता जिना अथवा लिफ्ट
– संपूर्ण फलाटाच्या शेडवर कव्हर. ऊन व पावसात प्रवाशांची सोय
– खाद्यपदार्थांचे स्टॉल, उपाहारगृह
– गाड्यांची माहिती कळण्यासाठी ‘पीआयएस’ प्रणाली, यात उद्घोषणा, डिस्प्ले बोर्डाचा समावेश.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Railway Tours | पुणे-इंदूर दरम्यान १४ साप्ताहिक रेल्वेच्या फेर्या
Railway | मध्य रेल्वे मालामाल ! मालवाहतुकीतून तब्बल ७७१ कोटींची कमाई
Railway | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाद मिटणार ; रेल्वेने घेतला हा निर्णय