Hadapsar News : हडपसर, (पुणे) : हडपसर पीएमपी स्थानक ते हडपसर रेल्वे स्टेशन अशी बस सेवा पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे.
प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर स्टेशन येथून हैदराबाद एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे सुरू आहे. ही रेल्वे आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी सुटते. तर याच दिवशी हैदराबाद येथून येणारी रेल्वे हडपसर येथे सकाळी १० वाजून ५० मिनिटांना येते.
हडपसर स्टेशन येथून प्रवाशांच्या सोयीसाठी स्वारगेट आणि डेक्कन येथून ‘पीएमपी’च्या बस सोडल्या जात होत्या. या बस हडपसर रेल्वे स्टेशन मार्गे डेक्कन, महापालिका, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क आणि हडपसर रेल्वे स्टेशन मार्गे स्वारगेट, पुलगेट, लष्कर पोलिस स्टेशन आणि घोरपडी अशा धावत होत्या. (Hadapsar News) पण, ‘पीएमपी’ने बसला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे कारण देत दोन्ही अचानक बस बंद केल्या होत्या.
रिक्षाचालकांकडून पुन्हा जादा पैसे घेतले जाऊ लागले आहेत. त्यामुळे बस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती. (Hadapsar News) तसेच, रेल्वे प्रशासनानेही येथून बस सुरू करण्यासाठी ‘पीएमपी’कडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने हडपसर पीएमपी स्थानक ते हडपसर स्टेशन अशी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यापासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. हडपसर पीएमपी स्थानक येथून शहराच्या विविध भागात बस जातात. (Hadapsar News) त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे म्हणाले, “हडपसर पीएमपी स्थानक ते हडपसर रेल्वे स्टेशन अशी बससेवा सुरू केली जाणार आहे. ही बससेवा पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Hadapsar News : लाठीचार्जमुळे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आक्रमक; माजी आमदार महादेव बाबर यांचं विधान