लोणी काळभोर, ता. 5 : अखेर 20 ते 25 वर्षापासून रखडलेल्या कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बारा फाटा रस्त्याच्या कामाला आज सोमवारी (ता. 5) शुभमुहूर्त मिळाला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आरोग्यदूत पै. युवराज हिरामण काकडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे, माजी सरपंच सचिन तुपे, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब घुले, डाळिंब उत्पादन संशोधन समिती सचिव गोरख घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कुंजीरवाडी येथील बारा फाटा हा रस्ता शेतकरी, नर्सरी व्यावसायिक व स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र मागील 20 ते 25 वर्षापासून या रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत होती. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक लहानमोठे अपघात होत होते. त्याचबरोबर चिखलात गाड्या घसरून अनेक नागरिक किरकोळ जखमी झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचेही डांबरीकरण व्हावे. अशी मागणी नागरिकांनी सरपंच हरेश गोठे यांच्याकडे केली होती.
सरपंच हरेश गोठे यांना या रस्त्याच्या विकासासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून थेऊर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा आरोग्यदूत पै. युवराज काकडे यांच्याकडे मागणी केली होती. युवराज काकडे यांनी सदर मागणीची त्वरित दखल घेतली. या रस्त्यासाठी लवकर निधी मिळावा म्हणून पै. युवराज काकडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान, या रस्त्याचे भुमिपुजन करून, आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, सागर निगडे, माजी उपसरपंच चंद्रकांत मेमाणे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, धनंजय धुमाळ, संतोष पोपट कुंजीर, काळुराम कुंजीर, गजानन जगताप, आदेश जाधव, एकनाथ कुंजीर, नवनाथ आंबेकर, सागर झेंडे, नंदकुमार बारवकर, नवनाथ कुंजीर, गणेश झेंडे, अमोल काकडे, रामदास चव्हाण, सोमनाथ जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्यात बारा फाटा रस्त्यावरून मोठी वाहतूक होणार आहे. त्यामुळे हा रस्ता होणे नागरिकांच्या गरजेसाठी होते. या रस्त्यावरून प्रवास्यांना सुखरूप, सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हा रस्ता येथील नागरिकांसाठी एक वरदान ठरणार आहे. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पै. युवराज काकडे यांनी प्रयत्न करून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. कुंजीरवाडीच्या विकासासाठी हा रस्ता महत्वाची भूमिका बजाविणार आहे. त्यामुळे नागरिकांनी युवराज काकडे यांचे भरभरून कौतुक करून आभार मानले.